Ad will apear here
Next
वाडेश्वर कट्ट्यावर पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन
वाडेश्वरचे ज्येष्ठ कामगार तुकाराम कुमकर यांना प्रकाशनाचा मान
पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना राहुल देशपांडे,  प्रवीण तरडे आणि वाडेश्वरचे ज्येष्ठ कामगार तुकाराम कुमकर. या वेळी  मकरंद टिल्लू, डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते.

पुणे : पुणे शहराला समर्पित असलेल्या  पुण्यभूषण या अभिनव दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच वाडेश्वर कट्ट्यावर झाले. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, अभिनेते प्रवीण तरडे आणि खवैय्या पुणेकरांची मनोभावे खान-पान सेवा करणारे वाडेश्वरचे ज्येष्ठ कामगार तुकाराम कुमकर यांच्या हस्ते या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत पुण्यातील यशस्वी साहित्य संमेलनानंतर पुणे शहराला समर्पित असलेला हा दिवाळी अंक काढण्याची अभिनव प्रथा पुण्यभूषण फाउंडेशन आणि त्रिदल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी सुरू केली. एका शहराला समर्पित असलेला हा एकमेव दिवाळी अंक मानला जातो. यंदाचा हा नववा दिवाळी अंक आहे. 

डॉ. सतीश देसाई म्हणाले, ‘दर वर्षी आम्ही पुण्याला साजेशी संकल्पना घेवून प्रकाशन समारंभ आयोजित करीत असतो. या वर्षी पुण्याच्या कट्टा संस्कृतीतील मानाचे पान असलेल्या  वाडेश्वर हॉटेल या कट्ट्यावर प्रकाशन समारंभ केला. याच कट्ट्यावर एरवी वर्षभर मान्यवर पुणेकरांना निमंत्रित करून त्यांच्याशी गप्पा मारण्याचा साप्ताहिक उपक्रम दर गुरुवारी सकाळी केला जातो. यंदाच्या अंकातील पहिले मानाचे पान भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना समर्पित करण्यात आले असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांचे, पुणेकरांचे आणि अनिवासी पुणेकरांचे लेख, आठवणी हे यंदाच्या पुण्यभूषण दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे.’

राहुल देशपांडे म्हणाले, ‘पुण्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पुणेरी प्रतीके आहेत. पुण्यभूषण दिवाळी अंक हे एक पुण्याचे वैशिष्ट्य बनले आहे. पुण्यात कानसेन, रसिक मंडळी मोठ्या प्रमाणावर आहेत. आज कोणीही पंडित पदवी लावतो, त्याचा सूर लागला नाही तर त्याचेही कान पुणेकर पकडतात. पुण्याची ही परंपरा आणि रसिक प्रवृत्ती पुणेकरांनी जपून ठेवावी.’

प्रवीण तरडे म्हणाले, ‘राहुल देशपांडे आणि मला बोलवून पुण्याचे सुरेल आणि रगेल सूर एकत्र आणले आहेत. पुरुषोत्तम स्पर्धा जिंकल्यानंतर पहिला सत्कार पुण्यभूषणतर्फे डॉ. सतीश देसाई यांनीच केला होता आणि आज पुण्यभूषण दिवाळी अंक प्रकाशनाचा मान दिला आहे.’

श्रीकांत शिरोळे, मकरंद टिल्लू, गोपाळ चिंतल यांनी स्वागत केले. दिलीप कुंभोजकर यांनी आभार मानले. या वेळी प्रल्हाद भागवत, सुरेश धर्मावत, रवी चौधरी, भाऊसाहेब कासट, गिरीश मुरुडकर, अभय वडझिरकर उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZTJCF
Similar Posts
‘दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरांनी टिकवले’ पुणे : ‘दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरांनी टिकवले. पुणेरी संस्कार, घटना, इतिहास याची नोंद पुण्यभूषण दिवाळी अंक घेतो, त्यामुळे हा अंक वैशिष्टयपूर्ण आहे,’ असे उद्गार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढले.
जवानांवरील हल्ल्याचा ‘पुण्यभूषण’कडून निषेध पुणे : काश्मीरमधील जवानांवरील दहशतवादी हल्ल्याचा पुण्यभूषण फाउंडेशनकडून निषेध करण्यात आला आहे. ‘हा हल्ला म्हणजे भारतीय लोकशाहीवरील हल्ला आहे. भारतीय सहनशीलतेची परीक्षा असून, आपण जशास तसे उत्तर देऊन जवानांच्या मृत्यूचा बदला घेतला पाहिजे’, अशी भावना ‘पुण्यभूषण’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे आहे
पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे रविवारी दिवाळी पहाटचे आयोजन पुणे : ‘दिवाळी पहाट’ संस्कृतीची सुरुवात करणाऱ्या त्रिदल-पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे आयोजित सत्ताविसावी दिवाळी पहाट रविवारी, २७ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात रंगणार आहे. सूर-ताल-नृत्य-गायन यांचा संगम असणाऱ्या ‘दीप-सूर तेजाळती’ नावाच्या या मैफलीत पं. राकेश चौरसिया यांचे बासरीवादन, पं
डॉ. गो. बं. देगलूरकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर पुणे : ‘पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार’ या वर्षी ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार पुरातत्वशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे,’ अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language